मकरंद अनासपुरे यांचा सामाजिक उपक्रम प्रेरणादायी

By Admin | Updated: February 18, 2017 00:40 IST2017-02-18T00:40:14+5:302017-02-18T00:40:14+5:30

सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ या संस्थेतर्फे महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Social Activities Inspirational of Makrand Anaspure | मकरंद अनासपुरे यांचा सामाजिक उपक्रम प्रेरणादायी

मकरंद अनासपुरे यांचा सामाजिक उपक्रम प्रेरणादायी

किशोर जोरगेवार : मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन चंद्रपुरात सत्कार
चंद्रपूर : सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ या संस्थेतर्फे महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर बाबुपेठ येथे मंगळवारी नाट्य प्रयोग पार पडला. या प्रयोगासाठी चंद्रपुरात आलेले सिनेअभिनेते मंकरद अनासपुरे यांना शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर जोरगेवार यांनी शाल, श्रीफळ व मानचिन्ह देवून सत्कार केला.
आजच्या धकधकीच्या व तांत्रीक युगात मानवी जीवनात सामाजिक कार्याची जोड हे सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे. मकरंद अनासपुरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात राबवित असलेले सामाजिक उपक्रम हे आजच्या पिडीला व आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी संदीप खोब्रागडे, अजय वैरागडे, रुपेशपांडे, अशोक खडके, तसेच विनोद गोल्लजवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Social Activities Inspirational of Makrand Anaspure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.