आतापर्यंत २२,०१९ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:14 IST2021-01-13T05:14:18+5:302021-01-13T05:14:18+5:30
आज मृत झालेल्यांमध्ये केळापूर जि. यवतमाळ येथील ६८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७८ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी ...

आतापर्यंत २२,०१९ जणांची कोरोनावर मात
आज मृत झालेल्यांमध्ये केळापूर जि. यवतमाळ येथील ६८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७८ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३४४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १२, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या २४ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील नऊ, चंद्रपूर तालुका दोन, बल्लारपूर एक, भद्रावती एक, सिंदेवाही एक, राजुरा दोन, चिमूर एक, वरोरा पाच व इतर ठिकाणचे दोन रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.