लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव नदी पात्रातील रेतीचे अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे. काही महिन्यांपासून सर्रासपणे ही तस्करी केली जात आहे. या आठवड्यात महसूल विभागाच्या पथकाने दोन ट्रॅक्टरधारकांवर कारवाई केली.प्रशासनाच्या वतीने पाच वर्षापूर्वी या घाटाचा लिलाव करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून हा घाट आजपर्यंत प्रशासनाने लिलावात काढला नाही. त्यामुळे रेती तस्करांची या घाटावर चांगलीच मांदियाळी दिसून येत आहे. भेजगावजवळ उमा नदी लागून असून येथील नदी पात्र उच्च दर्जाच्या रेतीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील रेतीची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मात्र या घाटाचा लिलाव झाला नसल्याने परिसरातील काही लोक रेतीची तस्करी करीत आहेत.दरम्यान, बेंबाळ येथील महसूल गौण खनिज पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अवैधरित्या गौण खनीज वाहतूक करणाºया कोरंबी येथील यशवंत पुरुषोत्तम खोब्रागडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच ३४ एपी ४३४१ व ट्रॉली क्रमांक एमएच ३४ एल ९४३८ ) पकडून कारवाई केली. त्यानंतर बेंबाळ येथील राकेश माने यांच्या मालकीचा मुरुमाचा ट्रॅक्टरही काल शनिवारला सकाळी पकडला. सदर ट्रॅक्टरची पथकाने तपासणी केली असता चालकाकडे मुरुमाचा कोणताही परवाना नव्हता. विशेष म्हणजे, या ट्रॅक्टरचा क्रमांकही अस्पष्ट असल्याचे दिसून आले.या पथकाची आठवड्यातील ही दुसरी कारवाई असून मूलचे उपविभागीय अधिकारी एम.व्ही. खेडकर, तहसीलदार राजेश सरवदे, निवासी नायक तहसीलदार पुरुषोत्तम कोमलवार यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी किरण घाटे, तलाठी शालीक परचाके, राजू आत्राम, योगेश सांगुळले, विनोद चिकटे यांच्या मदतीने दोन्ही कारवाया झाल्या.लिलाव केल्यास लाखोंचा महसूलमूल तालुक्यातील भेजगाव परिसरातील भेजगाव, सिंतळा, येरगाव, विरई या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी होत आहे. या घाटांचा प्रशासनाने लिलाव केला तर प्रशासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळेल व अवैध रेती तस्करीवर आळा बसेल.
उमा नदी पात्रातून रेतीची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:55 IST
मूल तालुक्यातील भेजगाव नदी पात्रातील रेतीचे अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे. काही महिन्यांपासून सर्रासपणे ही तस्करी केली जात आहे.
उमा नदी पात्रातून रेतीची तस्करी
ठळक मुद्देघाटाचा लिलाव करा : आठवडाभरात दोनदा कारवाई