वाढोणाच्या घाटावरून रेतीची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:37+5:302021-03-19T04:26:37+5:30

तळोधी बाः अपर तळोधी बा.तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या बोकोडोह, वाढोणा व चिखलगाव नाल्यातून मोठ्या प्रमाणात हायवा ट्रॅक्टरने ...

Smuggling of sand from Wadhwan Ghat | वाढोणाच्या घाटावरून रेतीची तस्करी

वाढोणाच्या घाटावरून रेतीची तस्करी

तळोधी बाः अपर तळोधी बा.तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या बोकोडोह, वाढोणा व चिखलगाव नाल्यातून मोठ्या प्रमाणात हायवा ट्रॅक्टरने रात्रभर अवैध रेतीची तस्करी होत असताना महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करीत नसल्याने शासनाच्या करोडो रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.

अपर तळोधी तहसील कार्यालय रामभरोसे झाले आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे जबाबदार अधिकारी नसल्याने दिवस-रात्रभर अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असतानासुद्धा कारवाई केली जात नाही, तसेच या तालुक्यात कुठल्याही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना रोज रात्रभर रेतीचे जे.सी.बी.उत्खनन करून ट्रॅक्टरने व हायवाने रेतीची शासकीय कामावर व नवीन प्लॅन्टवर रेती टाकली जात असताना महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी वर्गाशी हातमिळवणी करून रेती तस्कर मालामाल होत आहेत. याठिकाणी सामान्य कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मातीची गरज लागली तर त्याच्या वाहनावर महसूल विभागाच्यावतीने दंडात्मक कारवाई केली जाते; मात्र वर्षभर रेती व मुरुमाची तस्करी करणाऱ्या वाहनधारकांवर अजूनपर्यंत गौण खनिजाची कारवाई केली जात नसल्याने रेती तस्कर सैराट झाले आहेत. रात्रीच्या वेळेस महसूल विभागाचे पथक फिरत नसल्याने व वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने रात्रभर रेतीची अवैध तस्करी केली जात आहे. तळोधी बा. अपर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती व मुरुमाची तस्करी होत असतानासुद्धा त्याच्यावर गौण खनिजाची कारवाई होत नसल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडला जात आहे.

Web Title: Smuggling of sand from Wadhwan Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.