वीज केंद्राचा धूर लोकवस्तीकडे

By Admin | Updated: October 19, 2015 01:29 IST2015-10-19T01:29:18+5:302015-10-19T01:29:18+5:30

चंद्रपूरच्या विस्तारित वीज निर्मिती केंद्रात आठव्या संचाचे ट्रायल आॅपरेशन सुरू आहे.

The smoke of the electricity center is in the public place | वीज केंद्राचा धूर लोकवस्तीकडे

वीज केंद्राचा धूर लोकवस्तीकडे

प्रदूषणात वाढ : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अजिंक्य वाघमारे दुर्गापूर
चंद्रपूरच्या विस्तारित वीज निर्मिती केंद्रात आठव्या संचाचे ट्रायल आॅपरेशन सुरू आहे. या दरम्यान शनिवारी पहाटे ६ ते ७ च्या सुमारास धुरांड्यातून निघणारा काळाकुट्ट धूर वर अवकाशात न जाता थेट लोकवस्त्यांमध्ये शिरला. अत्याधुनिक पद्धतीने बांधकाम करण्यात आलेल्या या संचाची अशीच अवस्था राहिल्यास येथील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा भीषण दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रात सात संच आहेत. याशिवाय येथे ५०० मेगॉवॅटच्या दोन नव्या संचाचे बांधकाम सुरू आहे. ते अंतिम टप्प्यात आले आहे. यांपैकी संच क्रमांक आठचे ट्रायल आॅपरेशन सुरू आहे. या दोन्ही संचाचे बांधकाम सात संचापेक्षा वेगळे आहे. सुरूवातीला विस्तारित वीज केंद्रातील मुख्य अभियंत्याने आधुनिक पद्धतीने संचाचे बांधकाम होणार असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर या संचाच्या धुरांड्यातून धूर निघतो की नाही, हेदेखील समजणार नाही, असा दावाही केला. त्याप्रमाणेच याचे बांधकाम झालेले दिसत आहे. प्रदूषण पसरू नये यासाठी तब्बल २७५ मीटर एवढी उंच चिमणीचे बांधकाम करण्यात आले आहे. राख रोखून धरणाऱ्या ई.एस.पी. या संयत्राचेही अत्याधुनिक पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे. एवढी खबरदारी घेतल्यानंतरही उंच धुरांड्यातून काळ्याकुट्ट धुरांचे लोट शनिवारी लोकवस्त्यांमध्ये शिरला.

Web Title: The smoke of the electricity center is in the public place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.