४२ कुटुंबाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:42 IST2020-12-16T04:42:09+5:302020-12-16T04:42:09+5:30

चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने उडीया टोला येथील गरजू कुटुंबियासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी उडीया ...

The smiles on the faces of 42 families | ४२ कुटुंबाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

४२ कुटुंबाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने उडीया टोला येथील गरजू कुटुंबियासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी उडीया टोला येथील ४२ गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले. तसेच लहान मुलांना कपडे व मिठाई देण्यात आली.

कोरोनामुळे रोजगार हिरवला. अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही. ही बाब लक्षात घेऊन येथील रोटरी क्लबने उडीया टोला या गावात जावून येथील गरजु कुटुंबांना मिठाई, पेडा, कपडे आदी साहित्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपल्या समस्या कथन केल्या. क्लबच्या सदस्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. रोटरी क्लबच्या अध्यक्ष रमा गर्ग, अशोक गोयल, शंकुतला गोयल, कल्पना गुप्ता आदी उपस्थित होते.

Web Title: The smiles on the faces of 42 families