पऱ्हाटी वाढली, बोंड नाममात्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:52+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, चंद्रपूर आदी परिसरातील कपाशीच्या झाडांची वाढ उत्तमरित्या झाली. मात्र पाता आणि बोंडे खुपच अल्प प्रमाणात झाडावर असल्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात चांगलीच घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यंदा सुरूवातील पावसाने दांडी मारली होती.

The slopes rise, just as Bond did | पऱ्हाटी वाढली, बोंड नाममात्रच

पऱ्हाटी वाढली, बोंड नाममात्रच

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : कृषी विभागाने जनजागृती करावी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हंगामाच्या सुरुवातील पडलेल्या सततधार पावसामुळे चंद्रपूर भागातील शेतकरी चांगलाच मेटाकुटास आला. परंतु त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने व पिकाची योग्य निगा राखल्याने कपाशीच्या पिकाची वाढ बऱ्यापैकी झाली. परंतु सध्या वाढलेल्या पºहाटीला पाहिजे त्या प्रमाणात पाती अन् घड लागली नसल्याने या भागातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी या परिसरातील शेतपिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, चंद्रपूर आदी परिसरातील कपाशीच्या झाडांची वाढ उत्तमरित्या झाली. मात्र पाता आणि बोंडे खुपच अल्प प्रमाणात झाडावर असल्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात चांगलीच घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यंदा सुरूवातील पावसाने दांडी मारली होती. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या मुसळधार पावसाने या भागातील शेतकऱ्यांना सळो की पळो करूनच सोडले. सतत पाऊ स कायम राहिल्याने शेतीची अनेक कामे खोळंबली होती. अशातच अनेक शेतशिवारांना पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
शिवाय पिकाची वाढ बऱ्यापैकी झाली असे असले तरी सध्या एका कपाशीच्या झाडाला १० ते १५ इतकीच बोंड असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
यंदाच्या वर्षी सध्या सोयाबीनच्या उताऱ्यात बऱ्यापैकी घट येत असल्याचे शेतकरी सांगत आहे. पूर्वीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून त्यातच उत्पादनात घट येत असल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच बाजारपेठ भावही कमी आहे. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Web Title: The slopes rise, just as Bond did

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती