लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात जटपुरा गेट येथे आंदोलन केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच प्रतीकात्मक बॅनरला चपला, जोड्यांचा मार देण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सात वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. देशाच्या राजकारणातील अतिशय हुशार, कर्तबगार, अभ्यासू, उत्कृष्ट नेतृत्व म्हणून त्यांची देशात ओळख आहे. तरीसुद्धा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याविरोधात अपमानजनक वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य समस्त महिलांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक दीपक जयस्वाल, युवती जिल्हाध्यक्ष पाटील, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर कातकर, तालुका अध्यक्ष अनिता मावलीकर, ज्येष्ठ नेते एकनाथ कन्नाके, ज्येष्ठ नेते माणिक लोणकर, माजी नगरसेवक संजय वैद्य, दिनेश एकोणकर, शांताराम वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत खिल्लारे, ज्येष्ठ नेते शुक्रम ताडेकर, जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवळे, सरचिटणीस पूजा सेरकी, जिल्हा सरचिटणीस नीता मेश्राम, जिल्हा संघटक सरस्वती गावंडे, बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष शुभांगी साठे, शहराध्यक्ष अर्चना बटले, शहर कार्याध्यक्ष शाहजादी अंसारी, वरोरा शहर कार्याध्यक्ष मोनाली काकडे, मूल तालुका अध्यक्ष नीता गेडाम, जिल्हा सचिव शोभा घरडे आदी सहभागी झाले होते.
‘त्यांच्या’ प्रतीकात्मक बॅनरवर चपला, जोड्यांचा मार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST