शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कौशल्ययुक्त शिक्षणच तारेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 10:05 PM

बेरोजगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. कौशल्य नसल्याने स्पर्धेत टिकत नाही. आजचे शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल करून कौशल्य पूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे. एकूण बेरोजगारांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षेसाठी ५ लाख मुले तयारी करतात मात्र, दरवर्षी केवळ ३०० जागा भरतात. शिपाई पदाच्या १८६ जागांसाठी २ लाख बेरोजगारांचे अर्ज आले.

ठळक मुद्देअभय बंग : महात्मा गांधी विद्यालयात रोजगार मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : बेरोजगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. कौशल्य नसल्याने स्पर्धेत टिकत नाही. आजचे शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल करून कौशल्य पूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे. एकूण बेरोजगारांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षेसाठी ५ लाख मुले तयारी करतात मात्र, दरवर्षी केवळ ३०० जागा भरतात. शिपाई पदाच्या १८६ जागांसाठी २ लाख बेरोजगारांचे अर्ज आले. विशेष म्हणजे यात ४ हजार पीएचडीधारक विद्यार्थी होते. भारताची सध्या जॉबलेस ग्रोथ सुरू आहे. त्यामुळे कौशल्ययुक्त शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले.महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित ‘आरंभ उज्वल भविष्याची वाटचाल’ या व्याख्यानात ते बोलत होते. गडचांदूरचा राजा पब्लिक ट्रस्टच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता.प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार सुदर्शन निमकर, प्राचार्य गिरीधर बोबडे, सभापती शरद जोगी, विठ्ठल थिपे, धनंजय गोरे, अ‍ॅड. दीपक चटप, विकास भोजेकर उपस्थित होते. डॉ. अभय बंग म्हणाले, युवकांनी विद्यार्थ्यांनी करिअर कसे निवडावे? आयुष्यामध्ये काय करावे? स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी काय गरजेचे आहे, याचा विचार केला पाहिजे. जीवनात अनेक अडचणी येतात. पण निराश न होता सकारात्मक विचार करून पुढे जाण्याची गरज आहे. डॉ. बंग यांनी तरूणाईने विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. माजी आमदार चटप म्हणाले, युवकांनी शासकीय नोकरीपेक्षा शेती व उद्योगाकडे वळले पाहिजे. सर्वांगिण विकासासाठी विदर्भ राज्य हा पर्याय असल्याचेही त्यांनी नमुद केले. प्राचार्य बोबडे, दीपक चटप, अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे यांनी कौशल्य विकासासंबंधी माहिती दिली.प्रास्ताविक सुयोग कोंगरे, संचालन अ‍ॅड. दीपक चटप यांनी केले. आभार प्रवीण सातभाई यांनी मानले. अभिलाष तुराणकर, अक्षय मेंढी, गणेश कवलकर, सचिन सातभाई, मिथून देवकर, मंगेश कवलकर, सारंग मेंढी, नितेश डाखरे, अजित कोरे, अमित मांडवकर, चेतन सैताने, उमेश भांजेकर, अमित पारखी, देवानंद मून आदींनी सहकार्य केले.