राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सहा शिक्षक पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:35+5:302021-01-09T04:23:35+5:30

चंदपूर : प्रगत शैक्षणिक कार्यक्रमातंर्गत राज्यातील प्रत्येक मूल प्रगत व्हावे यासाठी शिक्षक नवनवीन प्रयोग करतात. कोरोना संकटातही शिक्षक, अधिकाऱ्यांनी ...

Six teachers from the district are eligible for the state level innovation competition | राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सहा शिक्षक पात्र

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सहा शिक्षक पात्र

चंदपूर : प्रगत शैक्षणिक कार्यक्रमातंर्गत राज्यातील प्रत्येक मूल प्रगत व्हावे यासाठी शिक्षक नवनवीन प्रयोग करतात. कोरोना संकटातही शिक्षक, अधिकाऱ्यांनी नवीन कल्पनांचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्यापन सुरु केले आहे. शिक्षकांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशिलतेचा प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे नवोपक्रम राज्यातील इतर शिक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील सहा शिक्षकांची राज्यस्तरावर तर अन्य शिक्षकांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे.

राज्यस्तरावर निवड झालेल्या शिक्षकांमध्ये गट १ मधून शिलत नरेश भुमर, गट २ मध्ये नरेश विद्याधर सुखदेवे, रजनी शामराव मोरे, अमर नारायण कसगावडे, गट ३ मधून पंकज वामनराव मत्ते, संजय अर्जन ठाकरे यांचे नवोपक्रम राज्यस्तरीय नवोक्रम स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.

ही स्पर्धा पूर्व प्राथमिक स्तर, प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, विषय सहायक विषय तज्ज्ञ, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्या गटामध्ये घेण्यात आली.

स्पधेर्चे ऑनलाईन मुल्यमापन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंज चापले यांच्या नियंत्रणात नोडल अधिकारी अधिव्या्ख्याता संजयकुमार मेश्राम, पर्यवेक्षक वरिष्ठ अधिव्याख्याता डाॅ. पल्हाद खुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या अधिव्याख्याता डाॅ. ज्योती राजपूत, जनता अध्यापक विद्यालय चंद्रपूरचे अध्यापक किरण डांगे यांनी परिक्षण केले.यामध्ये गट १ मध्ये शितल नरेशराव भुमर, व्दितीय प्रतिभा यादव बलकी, गट २ मध्ये नागेश विद्याधर सुखदेवे, व्दितीय रजनी शामराव मोरे, तृतीय अमर नारायण कसगावडे, चतुर्थ उमेश्वर नारायण आत्राम, पाचवा तुकाराम यादव धंदरे, गट ३ मध्ये प्रथम पंकज वामनराव मत्ते, व्दितीय संजय अर्जून ठाकरे यांनी क्रमांक मिळविला.

Web Title: Six teachers from the district are eligible for the state level innovation competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.