ब्रह्मपुरीत सहा जुगाऱ्यांना अटक, तिघे फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:17+5:302021-07-07T04:35:17+5:30

ब्रह्मपुरी : येथून जवळच असलेल्या कहाली रोड वीटभट्टीजवळ जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांनी मिळताच धाड टाकली. यावेळी दोन ...

Six gamblers arrested in Brahmapuri, three absconding | ब्रह्मपुरीत सहा जुगाऱ्यांना अटक, तिघे फरार

ब्रह्मपुरीत सहा जुगाऱ्यांना अटक, तिघे फरार

ब्रह्मपुरी : येथून जवळच असलेल्या कहाली रोड वीटभट्टीजवळ जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांनी मिळताच धाड टाकली. यावेळी दोन लाख ९९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून तीन जण फरार झाले आहे. ही कारवाई ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने केली.

कारवाईत प्रवीण दोनाडकर रा. दिघोरी, आशिष पिल्लेवान, आदर्श बनकर, आजाद लोखंडे तिघेही रा. कहाली, नरेंद्र मेश्राम, उमेश रावेकर दोन्ही रा. ब्रह्मपुरी असे एकूण सहा आरोपी जुगार खेळताना आढळून आले, तर उर्वरित तीन आरोपी हे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

कारवाईत वीस हजार ६०० रुपये नगदी तसेच आरोपींच्या ताब्यातील मोबाइल एकूण किंमत २४ हजार रुपये तसेच घटनास्थळी मिळून आलेल्या एकूण पाच मोटारसायकल किंमत दोन लाख ५५ हजार रुपये असा एकूण दोन लाख ९९ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनेतील आरोपींवर मुंबई जुगार कायदा कलम १२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक अनुज तारे, पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, पोहेका नरेश रामटेके, रवींद्र पिसे, नापोका उमेश बोरकर, मुकेश गजबे, नितीन भगत, पोका नरेश कोडापे, प्रमोद सावसाकडे, प्रकाश चिकराम यांच्या पथकाने केली.

Web Title: Six gamblers arrested in Brahmapuri, three absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.