आयुध निर्माणीतील सहा कर्मचारी निलंबित

By Admin | Updated: March 4, 2016 00:57 IST2016-03-04T00:57:53+5:302016-03-04T00:57:53+5:30

येथील आयुध निर्माणीमधून ओडीसा राज्यातील बोलंगीर येथे आयुध निर्माणीत डेप्युटेशनवर पाठविण्यात आलेले वाहन वेळेवर पोहचले नाही.

Six employees of the Ordnance Factory are suspended | आयुध निर्माणीतील सहा कर्मचारी निलंबित

आयुध निर्माणीतील सहा कर्मचारी निलंबित

भद्रावती: येथील आयुध निर्माणीमधून ओडीसा राज्यातील बोलंगीर येथे आयुध निर्माणीत डेप्युटेशनवर पाठविण्यात आलेले वाहन वेळेवर पोहचले नाही. त्यामुळे तिथून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन येथील महाव्यवस्थापकांनी सहा कामगारांना निलंबित केल्याची खात्रीलायक माहिती आहे.
या संदर्भात आयुध निर्माणीच्या महाप्रबंधकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. आठवड्यापूर्वी आयुध निर्माणी चांदा येथून डेप्युटेशनवर काही साहित्य घेऊन एक ट्रक ओडीसातील बोलंगीर येथील आयुध निर्माणीकडे रवाना झाला. यावेळी निर्माणीतील सहा कर्मचारी होते. त्यात एक चालक, दोन डीएससी जवान तर तीन कामगारांचा समावेश होता. सदर कर्मचारी वेळेच्या आत न पोहोचल्याने बोलंगीर आयुध निर्माणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील महाप्रबंधकांकडे तक्रार केली. वेळेनंतर पोहचलेल्या कर्मचाऱ्यांना ही बाब माहीत झाल्यानंतर उशिरा पोहचण्यासाठी तूच जबाबदार आहे, असे एकमेकांवर आरोप करुन एकमेकांशी भांडू लागले. ही तक्रारसुद्धा येथील महाप्रबंधकांकडे प्राप्त झाली. सर्व कर्मचारी डेप्युटेशनवर येथे २ मार्चला पोहोचल्यानंतर महाप्रबंधकांनी त्यात सर्वांना दोषी ठरवित निलंबित केल्याची माहिती आहे. यासंदर्भात खरी माहिती जाणून घेण्याकरिता महाप्रबंधकांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता वार्ताहर असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी फोन ठेवून दिला.
त्यातच निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी हा आयुध निर्माणी वसाहतीमधील डीएससी या भागात दारू विक्री करतो. त्यामुळे या ट्रकद्वारे अवैध दारूची वाहतूक करीत असल्याच्या सूचनेवरुन येथील कर्णलने प्रत्यक्ष झडती घेतल्याची कामगारात चर्चा आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Six employees of the Ordnance Factory are suspended