आगीत सहा जनावरे होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:07 IST2017-09-02T00:06:41+5:302017-09-02T00:07:04+5:30

तालुक्यातील चारगाव (खु) येथील गोठ्यास लागलेल्या आगीत सहा जनावरे होरपळली. तर साहित्यही जळून खाक झाले.

Six animals roared in the fire | आगीत सहा जनावरे होरपळली

आगीत सहा जनावरे होरपळली

ठळक मुद्देचारगाव (खु) येथील गोठ्यास लागलेल्या आगीत सहा जनावरे होरपळली.

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : तालुक्यातील चारगाव (खु) येथील गोठ्यास लागलेल्या आगीत सहा जनावरे होरपळली. तर साहित्यही जळून खाक झाले. ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली.
सहा जनावरे जखमी झाले असून ते मृत्यूशी झुंज देत आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे मानले जात आहे. या आगीत चारगाव (खु) येथील रवींद्र माथनकर यांचे मोठे नुकसान झाले. गोठ्याला आग लागली तेव्हा नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेवून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत गोठ्यात बांधलेल्या सहा जनावरांना सोडविले. त्यात सहाही जनावरांना आगीची झळ पोहोचली.
प्राथमिक पाहणीत शार्ट सर्कीटने आग लागल्याचे दिसून येत नाही, असे वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सिंग, यांनी सांगितले.
 

Web Title: Six animals roared in the fire