खासगीकरणाविरोधात रेल्वेस्टेशनसमोर सिटूचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST2021-03-16T04:29:22+5:302021-03-16T04:29:22+5:30
चंद्रपूर : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या केंद्रीय कमिटीच्या आणि राज्य कमिटीच्या निर्णयानुसार केंद्र सरकारने सुरू केलेल्या खासगीकरण ...

खासगीकरणाविरोधात रेल्वेस्टेशनसमोर सिटूचे धरणे
चंद्रपूर : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या केंद्रीय कमिटीच्या आणि राज्य कमिटीच्या निर्णयानुसार केंद्र सरकारने सुरू केलेल्या खासगीकरण व व्यावसायिकीकरण धोरणाच्याविरोधात १५ मार्चला राष्ट्रीय खासगीकरण व व्यावसायिकीकरण विरोधी दिवस पाळण्यात आला. दरम्यान, सिटूच्या वतीने चंद्रपूर रेल्वेस्टेशनसमोर धरणे देण्यात आले.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स चंद्रपूर जिल्हा कमिटीतर्फे रेल्वेस्टेशन चंद्रपूरसमोर राष्ट्रीय खासगीकरण व व्यावसायिकीकरण दिवसानिमित्त धरणे देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद वाघमारे, कार्याध्यक्ष वामन बुटले, जी. रामण्णा, प्रमोद अर्जुनकर, गणपत कुडे, शेख जाहीद, मंचित दवंडे, कैलाश रोडे, संतोष तुरेंद्र, दिलीप रामलीवार, गुलाब खोब्रागडे, संताश ताजने, मधुकर वाळके, दिनेश गभणे, अमोल शेंडे, अनिल वरखेडे यांनी केले.