कृषी कायद्याविरोधात सीटूचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:14 IST2021-01-13T05:14:12+5:302021-01-13T05:14:12+5:30
चंद्रपूर : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स कमिटी चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...

कृषी कायद्याविरोधात सीटूचे आंदोलन
चंद्रपूर : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स कमिटी चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात शेतकरीविरोधी लोकशाही विरुद्ध जाऊन तीन कृषी कायदे मंजूर केले. याचा विपरीत परिणाम होणार आहे. तसेच पावसाळी अधिवेशनात औद्योगिक संबंध, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा या तीन श्रम कायदा मंजूर केला. श्रमिकांना संघर्षातून मिळवलेल्या ४४ पैकी २९ कायद्यांचे श्रमसंहितेत रुपांतर करून सर्वच कायदे निष्प्रभ केले. त्यामुळे कृषी व श्रमकायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सीटूचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद वाघमारे, एस. एच. बेग, वामन बुटले, जी. रमण्णा, प्रमोद अर्जुनकर, शेख जाहिद, मंचित दवंडे, दिलीप रामलीवार, मंगेश बदखल, मधुकर वाळके, नामदेव कन्नाके, संतोष दास आदी उपस्थित होते.