एक तास चाललेल्या थराराचा "सिंघम"ने घटनास्थळीच बेड्या ठोकून केला अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:26 IST2021-09-13T04:26:41+5:302021-09-13T04:26:41+5:30
सुमारे एक तास हा थरार चालला. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांच्या वेळेत झालेल्या एन्ट्रीने दहशत संपली. घटनास्थळ हे रामनगर पोलीस ...

एक तास चाललेल्या थराराचा "सिंघम"ने घटनास्थळीच बेड्या ठोकून केला अंत
सुमारे एक तास हा थरार चालला. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांच्या वेळेत झालेल्या एन्ट्रीने दहशत संपली. घटनास्थळ हे रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या घटनेची माहिती रामनगरची पोलीस निरीक्षक धोबे यांना देण्यात आली. त्यांनीही वेळीच धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉक्स
एका बियरबारमध्येही घातला धिंगाणा
विक्रम टाक व त्याच्या साथीदार त्याच परिसरातील एका बियर बारमध्ये नंगी तलवार घेऊन गेले होते. तेथे धिंगाणा घालून रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना तलवारीचा धाक दाखवून लूटमार करीत होते, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
बॉक्स
त्यांनी हद्दीचीही केली नाही पर्वा
अधिकार क्षेत्रातील हद्दीची पर्वा न करता आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघमारे यांनी आपले कर्तव्य बजावले. अशाच प्रकारे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणते क्षेत्र कुणाच्या हद्दीत येते, याची पर्वा न करता गुन्हेगारीचा नायनाट करून कायदा-सुव्यवस्था जर का राखून ठेवली तर मंदिरातून चप्पलही चोरी जाणार नाही, हे नाकारता येत नाही. या प्रकरणात सूरज ठाकरे यांनी जागरूकता दाखवली नसती तर हा प्रकार असाच सुरू राहिला असता.