सिंदेवाही नागपूर हायवे रोडची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:44+5:30
सिंदेवाही तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर, नवरगाव-पाथरी, शहरातील जुना बसस्थानक शांतीभूषण रेस्टारंटसमोर मोठा खड्डा पडला आहे. या परिसरात अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अनेकाना दुखापतसुद्धा झाली आहे. मात्र तरीसुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही. सिंदेवाही ते नागपूर हा हायवे मार्ग आहे.

सिंदेवाही नागपूर हायवे रोडची दैना
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : सिंदेवाही ते नागपूर या हायवे रोडवर मोठ्या प्रमाणात मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचले आहे. परिवानी वाहनधारकांना वाहन चालविताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. परिणामी मोठ्या अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
सिंदेवाही तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर, नवरगाव-पाथरी, शहरातील जुना बसस्थानक शांतीभूषण रेस्टारंटसमोर मोठा खड्डा पडला आहे. या परिसरात अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अनेकाना दुखापतसुद्धा झाली आहे. मात्र तरीसुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही. सिंदेवाही ते नागपूर हा हायवे मार्ग आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात ट्रक, हायवा असे अवजड वाहने जात असतात. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरु झालेल्या संततधार पावसाने रस्त्याची तर चाळण झाली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्डयावर साचले असून रहदारी करण्यास मोठी अडचण जात आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.
लोनवाहीतील रस्त्याची दुरुस्ती करा
संततधार पावसाने सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथील रस्ते उखडले आहेत. त्यासोबतच येथील रपट्याचीसुद्धा दुरवस्था झाली आहे.मागील अनेक दिवसांपासून रस्त्याची दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचाच परिपाक म्हणजे संततधार पावसाने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने अपघाताची शक्यता आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच गणेश गोलपल्लीवार यांनी केली आहे.