शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाक्षरी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:40 IST2021-02-26T04:40:33+5:302021-02-26T04:40:33+5:30

चिमूर : मागील तीन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचे जीव या आंदोलनात गेले आहेत. शासनाने या ...

Signature campaign to support the farmers' movement | शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाक्षरी अभियान

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाक्षरी अभियान

चिमूर : मागील तीन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचे जीव या आंदोलनात गेले आहेत. शासनाने या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या आंदोलनातील शेतकऱ्यांना समर्थन देण्याकरिता राष्ट्र सेवा दलातर्फे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्र सेवा दलातर्फे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. अनेक नागरिकांनी सह्या करीत शेतकरी आंदोलनाला भरघोस प्रतिसाद दिला. नागरिकांच्या सह्यांचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल यांना तहसीलदार चिमूर यांच्यामार्फत पाठविण्यात आले.

निवेदन देताना राष्ट्र सेवा दल मंडळ सदस्य तथा शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे, शिक्षक भारती चिमूर तालुकाध्यक्ष रावन शेरकुरे, जिल्हा सचिव रामदास कामडी, शिक्षक भारती तालुका कार्याध्यक्ष नरेश पिल्लेवान, सचिव कैलाश बोरकर, राष्ट्र सेवा दलाचे मनोज राऊत, भाग्यवान नंदेश्वर आदी उपस्थित होते.

Web Title: Signature campaign to support the farmers' movement