पाथरी-विहीरगाव मार्गावर झुडपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:41+5:302021-02-05T07:39:41+5:30
सावली : तालुक्यातील पाथरी-विहीरगाव रस्त्यावर अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना अडचण येत आहे. वनविभागाने ...

पाथरी-विहीरगाव मार्गावर झुडपे
सावली : तालुक्यातील पाथरी-विहीरगाव रस्त्यावर अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना अडचण येत आहे. वनविभागाने रस्त्यावर आलेली झाडे तोडावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मोठे वाहन आल्यास झुडपांमुळे दुचाकी वाहनधारकांना अडचण निर्माण होत आहे.
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्यावे
चंद्रपूर : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नसल्याने अडचण येत आहेत.
वाकलेले विद्युत खांब बदलावे
चंद्रपूर : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक विद्युत खांबे वाकले आहेत. त्यामुळे या खांबांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक दिवसांपासून खांब वाकलेल्या अवस्थेत असल्याने अपघात होऊ शकतो. याबाबत वीज वितरण कंपनीकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.