तलावाच्या नहरात झुडपी जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST2020-12-11T04:56:25+5:302020-12-11T04:56:25+5:30

बल्लारपूर : तालुक्यातील कवडजई येथील मांगली तलावामुळे परिसरातील शेकडो शेतकºयांना सिंचनाची सोय झाली आहे. मात्र तलावाच्या नहराची दुरवस्था ...

Shrub forest in the canal of the lake | तलावाच्या नहरात झुडपी जंगल

तलावाच्या नहरात झुडपी जंगल

बल्लारपूर : तालुक्यातील कवडजई येथील मांगली तलावामुळे परिसरातील शेकडो शेतकºयांना सिंचनाची सोय झाली आहे. मात्र तलावाच्या नहराची दुरवस्था झाली असून झुडपे वाढले आहे. भविष्यात शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नहराच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

शहरातील एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

चंद्रपूर : शहरातील काही एटीएम मध्ये सुरक्षारक्षकच राहत नसल्याने एटीएमचीसुरक्षा रामभरोशे आहे. त्यामुळे एखाद्या अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एटीएमध्ये रक्षक ठेवावे, अशी मागणी आहे.

मोकाट जनावरांवर उपासमारी

चंद्रपूर : शहरातील मोकाट जनावरांवर उमासमारीची वेळ आली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था त्यांना खाऊ घालत आहे. शहरातील अनेक भागात जनावरे अन्नाची शोधाशोध करीत फिरत असतांना दिसून येत आहेत.

बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

चंद्रपूर : यावर्षी परतीच्या पावसामुळे तसेच कोरोनामुळे झालेने नुकसान बघता शेतकऱ्यांना ना रब्बी हंगामासाठी पेरणीसाठी बी-बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच धान अद्यापही निघाले नाही. त्यामुळे संकटात आहेत.

रिक्षाचालकांना आर्थिक त्रास

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या संख्येने रिक्षा चालक आहे. यामाध्यमातून ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. मात्र कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय बंद झाला आहे. काही मोजक्याच रिक्षा चालकांना रोजगार मिळत आहे. परिणामी दिवस कसे काढावे, असा प्रश्न त्यांना पडत आहे.

पुलावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका

कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जडवाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे.

कार्यालयांमधील बायोमेट्रिक नावापुरतेच

चंद्रपूर : शासकीय कार्यालयात बॉयोमेट्रिक मशीन बसविण्यात आले. कोरोनामुळे मशीन बंद होत्या. आता सुरू करण्यात आल्या. मात्र अनेक कार्यालयातील बॉयोमेट्रिक मशीन अजुनही बंद आहेत.

रस्त्यावर कचरा टाकण्यास आळा घालावा

चंद्रपूर : शहरातील विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वार्डातील नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होवू शकतात. त्यामुळे मनपाने स्वच्छता कर्मचाºयांना तातडीने वार्डात पाठवावे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

शिंगाळा उत्पादनासाठी हवे अर्थसहाय्य

भद्रावती : जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात. परंतु, या व्यवसायाकरिता पैशाच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व सिंगाडा लागवडीकरिता निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मत्स्यपालन सहकारी संस्थांनी निवेदनातून केली आहे.

पदोन्नतीचा प्रश्न

अजुनही प्रलंबित

वरोरा : नगर परिषदतंर्गत कार्यरत स्वच्छता कामगारांची शैक्षणिक पात्रता असताना पदोन्नती देण्यात आली नाही, असा आरोप कामगार संघटनाकडून होत आहे. कर्मचाऱ्यांना पदोन्नतीअभावी केवळ स्वच्छता कर्मचारी म्हणून वर्षानुवर्षी काम करावे लागत आहे. जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा निघून जात आहे. त्यामुळे पदोन्नतीचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.

जनरिक औषधसाठा वाढवाण्याची मागणी

सास्ती : पंतप्रधान जनआरोग्य औषधी केंद्रामध्ये शासनाच्या सवलतीत औषधसाठा वितरीत करण्यात येतो. मात्र या केंद्रात अत्यल्प प्रकारचा औषधसाठा उपलब्ध आहे. परिणामी अतिरिक्त पैसे देवून रुग्णांना औषधांची खरेदी करावी लागत आहे. औषधसाठा वाढवण्याची मागणी आहे.

Web Title: Shrub forest in the canal of the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.