भाविकांचे श्रद्धास्थान साठगावचे महानुभाव श्रीदत्तमंदिर

By Admin | Updated: December 25, 2015 00:32 IST2015-12-25T00:32:48+5:302015-12-25T00:32:48+5:30

चिमूर तालुक्यातील साठगाव हे नागपूर, भंडारा व चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं छोटंस गाव.

Shrideatmandir Mahanubhipa of the devotees of Lord Ganesh Shastri | भाविकांचे श्रद्धास्थान साठगावचे महानुभाव श्रीदत्तमंदिर

भाविकांचे श्रद्धास्थान साठगावचे महानुभाव श्रीदत्तमंदिर


चिमूर तालुक्यातील साठगाव हे नागपूर, भंडारा व चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं छोटंस गाव. या गावाचे आकर्षण म्हणजे टेकडीवर असलेले श्री दत्तात्रेय प्रभूचे मंदिर. या मंदिराच्या जागी यापूर्वी श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या विशेषाचे (पाषाणमूर्ती) झोपडीवजा मंदिर होते. श्रीदत्तात्रेय प्रभूचे निद्रास्थान असलेल्या माहुर येथे त्याकाळी मालगुजार गावंडे पाटील यांची खाचर बैलाने माहुरवारी होत असे. अशाच एका वारीमध्ये बैलाच्या खुरात माहुरचा विशेष आल्याचे म्हटले जाते. सदर विशेषाचा गावंडे पाटील यांना साक्षात्कार झाला व मिळालेल्या विशेषाची साठगाव येथील टेकडीवर प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून श्रीदत्तजयंती यात्रा येथे सुरु असल्याचे सांगितले जाते. या मंदिरामध्ये दररोज त्रिकाल पूजाअर्चा सुरु असून दर पौर्णिमेला भक्त मंडळी श्रद्धा व भक्तीभावाने पूजाअर्चा करण्यासाठी या मंदिरात येत असतात.
काही भाविक मंडळी पाच दिवसांपासून तर सव्वा महिन्यापर्यंत येथे थांबतात.नवरात्रीमध्ये येथे दररोज अन्नदान केले जाते. तर मार्गशिर्ष महिन्यात भाविक सहभोजनासाठी येथे येत असतात.
या पुरातन मंदिराची उभारणी चुनखडीमिश्रीत विटांनी करण्यात आली आहे. श्रीदत्तात्रेय प्रभूच्या विशेषावर अंत्यत वेधक व कलाकुसरयुक्त चांदीचा मुखवटा बसविलेला आहे. लाकडी रथावरील नक्षीकाम उत्कृष्ट कलेचा नमुनाच आहे. याच रथावर दरवर्षी मार्गशिष पौर्णिमेला श्रीदत्तात्रेय प्रभूच्या विशेषाची बँड व भजनाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात येते. गावामध्ये या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करुन श्रीदत्तात्रेय प्रभूच्या विशेषास विडाअवसर व उपहार समर्पण करण्यात येते. दत्तजयंतीपासून मार्गशिर्ष कृ. प्रतिपदा या दिवसापर्यंत येथे यात्रा असते. याप्रसंगी भजन कीर्तन, प्रवचन व गोपालकाला, महाप्रसाद वितरीत होतो. शेवटच्या दिवशी रात्री गावातील युवक मंडळी नाटकाचे आयोजन करतात.
या मंदिरास तिर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जा मिळाला असून मंदिर परिसरात पाहिजे त्या प्रमाणात आवश्यक सोयी सुविध उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. सदर पुरातन मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कार्य माहुर पिठाधीश महंत मधुकरशास्त्री कवीश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली भक्त मंडळींच्या सहकार्याने विनोद रामचंद्र पाटील गावंडे यांनी सुरु केलेले आहे.
समस्त गावकरी व परिसरातील सदभक्त मंडळी यांचे श्रद्धा व स्नेहाने स्व. कवडू पाटील गावंडे यांचे कुटुंब महानुभाव श्रीदत्तात्रेय प्रभू मंदिरात श्रीदत्त जयंती यात्रा महोत्सव आजही मोठ्या उत्साहाने साजरा करतात. साठगाव येथील श्रीदत्तप्रभूची महिमा पंचक्रोशीत असून बहुसंख्येने भाविक श्रीदत्तजयंती यात्रा महोत्सवाकितरा उपस्थित असतात.
-संजय बोबडे , माजी सरपंच साठगाव

Web Title: Shrideatmandir Mahanubhipa of the devotees of Lord Ganesh Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.