घुग्घुस येथे श्री प्रभू विश्वकर्मा जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:41 IST2021-02-26T04:41:19+5:302021-02-26T04:41:19+5:30
घुग्घुस : श्री विश्वकर्मा मयात्मज सुतार संस्था तथा श्री प्रभू विश्वकर्मा युवा समिती, घुग्घुसच्या वतीने येथील प्रभू विश्वकर्मा ...

घुग्घुस येथे श्री प्रभू विश्वकर्मा जयंती
घुग्घुस : श्री विश्वकर्मा मयात्मज सुतार संस्था तथा श्री प्रभू विश्वकर्मा युवा समिती, घुग्घुसच्या वतीने येथील प्रभू विश्वकर्मा मंदिरात सामाजिक अंतर व कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत श्री प्रभूकर्मा जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मंचावर गजानन साखरकर, सुनील जानवे, मारोती
वनकर, विशाल बोरीकर, भांदककर, घुग्घुसचे सुतार समाजाचे अध्यक्ष योगेश भांदककर, हरेंद्र अंड्रस्कर उपस्थित होते.
यावेळी निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.
निबंध स्पर्धा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस निखिता जानवे, अस्मिता मूठ्ठलकर, भारती भांदकर, तर प्रोत्साहनपर कुणाल दुरुटकर, वैष्णवी जानवे यांना मिळाला. सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रिशीत बोरीकर, द्वितीय स्वरा जानवे, तृतीय मानस डाखोरे, प्रोत्साहन बक्षीस लावण्या दांडेकर, उत्कर्षा राखुंडे यांना देण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली. यावेळी विशाल दुरुटकर, सचिन साखरकर, मोरेश्वर डाखोरे, संदीप जानवे, निखिल जानवे, नीता वांढरे, नंदा दुधुलकर, प्रांजली साखरकर, निखिल जानवे, सारिका बोरीकर, साधना राखुंडे उपस्थित होते.