श्रेडरमुळे पिकांच्या उत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:39+5:302021-02-05T07:41:39+5:30

चंद्रपूर : कापूस वेचल्यावर पराठी काढण्यासाठी श्रेडर यंत्राचा वापर केल्यास त्यामुळे पराठीचा भुगा होतो व कालांतराने ते जमिनीत कुजून ...

Shredder increases crop yields | श्रेडरमुळे पिकांच्या उत्पादनात वाढ

श्रेडरमुळे पिकांच्या उत्पादनात वाढ

चंद्रपूर : कापूस वेचल्यावर पराठी काढण्यासाठी श्रेडर यंत्राचा वापर केल्यास त्यामुळे पराठीचा भुगा होतो व कालांतराने ते जमिनीत कुजून सेंद्रिय कर्ब तयार होते. याचा उपयोग पुढच्या हंगामातील पिकांचे उत्पादन वाढीस होत असल्याचे कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी काल श्रेडरचे कापूस पिकातील फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले.

मौजा टाकळी येथे कापूस फरदड निर्मूलन मोहिमेंतर्गत राम दादाजी सन्मानवार यांच्या शेतात कापूस श्रेडरचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भोसले यांनी श्रेडरमुळे कपाशीची पराठी भुगा केल्यास गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित होऊन पुढील उत्पत्ती थांबते व पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा कीडरोग नियंत्रणात येते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी निराकरण केले.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत राकेश रामटेके यांना कापूस श्रेडर यंत्राचा लाभ देण्यात आला. याचा उपयोग ते तालुक्यातील फरदड निर्मूलनासाठी करत असल्याचे तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव यांनी सांगितले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी उमाकांत झाडे, कृषी पर्यवेक्षक मारुती बर्वे, आनंद वाकडे, प्रवीण देऊळकर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Shredder increases crop yields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.