माझी वंसुधरा अभियानाअंतर्गत लेंढारा तलावात श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST2021-03-09T04:31:29+5:302021-03-09T04:31:29+5:30
सिंदेवाही : सिंदेवाही नगरपंचायतच्या वतीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. ...

माझी वंसुधरा अभियानाअंतर्गत लेंढारा तलावात श्रमदान
सिंदेवाही : सिंदेवाही नगरपंचायतच्या वतीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियांनाचा एक भाग म्हणून सिंदेवाही नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र. १ मधील लेंढारा तलाव येथे श्रमदान करण्यात आले.
यावेळी नगरपंचायतीचे अध्यक्ष आशा विजय गंडाटे,स्वप्नील योगराज कावळे, नंदा यादव बोरकर, नरेंद्र चरणदास भैसारे, सुरेश सोनूजी पेंदाम, भुपेश विठ्ठलराव लाखे, पुष्पा वामनराव मडावी उपस्थित होते. त्यानंतर नगरपंचायत कार्यालयात समारोपीय कार्यक्रमाचे वेळी सिंदेवाही शहरामध्ये स्वच्छता दूत म्हणून शहरात स्वंयस्फूर्तीने दररोज कचरा जमा करण्याचे कार्य व घनकचरा व्यवस्थापनासंबंधी जनजागृती व प्रबोधन करणारे प्रमोद श्यामराव बावणे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन सुधाकर निकूरे, तर आभार प्रदर्शन सुधीर ठाकरे यांनी केले.