चंद्रपुरात इंदिरा गांधींना श्रद्धाजंली
By Admin | Updated: November 2, 2016 00:59 IST2016-11-02T00:59:34+5:302016-11-02T00:59:34+5:30
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांचा ३१ आॅक्टोबरला स्मृती दिवस पाळला जातो.

चंद्रपुरात इंदिरा गांधींना श्रद्धाजंली
चंद्रपूर : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांचा ३१ आॅक्टोबरला स्मृती दिवस पाळला जातो. यानिमीत्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय गांधी चौक चंद्रपूर येथे काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनच्या वतीने स्व. इंदिरा गांधी यांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.
सर्वप्रथम ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी तसेच चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण केले व त्यानंतर उपस्थित सर्वांनी प्रतिमेला पुष्पार्पण करून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी मंचावर नरेश पुगलिया, गजानन गावंडे, महानगरपालिका मधील काँग्रेस गटनेता प्रशांत दानव, डॉ. सुरेश महाकुलकर, अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, एनएसयुआयचे स्वप्नील तिवारी, सेवादलचे प्रमुख अशोक आक्केवार, ओबीसी विभागाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र बेले, सुधाकरसिंह गौर उपस्थित होते.
आभार प्रदर्शन प्रशांत दानव यांनी केले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी प्रियदर्शिनी चौकातील स्व. इंदिराजी गांधींच्या पुतळ्याजवळ जावून तिथे श्रद्धाजंली वाहिली.
याप्रसंगी नगरसेवक महेंद्र जयस्वाल, देविदास गेडाम, राजू रेवल्लीवार, रमजान अली, वहीद अली गुरुजी, खालीक भाई, अरुण बुरडकर, अविनाश बुरडकर, संजय महाडोळे, संजीवनी जोशी, रत्नमाला बावणे, मुत्यरी बेगम, छाया बरडे, संगिता भोयर, मुर्ली चौधरी, अशोक आक्केवार, बाबुलाल करुणाकर, ईकबालभाई, दिगंबर लोडल्लीवार, वहिद मास्टर, गणेश कन्नोजवार, विनोद पिंपळशेंडे, अनंता हुड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. (स्थानिक प्रतिनिधी)
इंदिरा गांधी स्मृती दिन व सरदार वल्लभभाई पटेल जयंती
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी शहर अध्यक्ष नंदु नागरकर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्ष कार्यालय दाताळा येथे राष्ट्रमाता भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या ३२ वा शहिद दिवस तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच चंद्रपूर शहरातील इंदिरा गांधी यांच्या स्मारकाजवळ चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माल्यार्पण करुन श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शहर अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंग गौर, म.प्र. सचिव आसावरी देवतळे, सुनिता लोढीया, अॅड. विजय मोगरे, विनोद दत्तात्रय, महेश मेंढे, प्रा. अनिल शिंदे, संजय रत्नपारखी, अनिल सुरपम, वंदना भागवत, शालिनी भगत, सुनंदा कोवले, राजू सारिडेक, सुभाष डोनाडे, केशव रामटेके, मोहन डोंगरे, सुरेश दुर्सेलवार, शाम राजुरकर, सागर वानखेडे, अनवर अली मुन्ना शाहा, पंकज टापरे, पंकज नागरकर, रेहान शेख, श्रीकृष्ण नंदुरकर, मनोज वानखेडे सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.