कारणे दाखवा नोटीसला बिबी ग्रा.पं.चे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:19+5:302021-01-09T04:23:19+5:30

कोरपना : कोरपना तालुक्यातील बिबी ग्रामपंचायतीच्‍या आदर्श ग्राम दौऱ्याबाबत तक्रारी करण्यात आल्यानंतर जि.प.चे सीईओ यांनी सरपंचांना कारणे दाखवा नोटीस ...

Show Reasons Explanation of Bibi G.P. to the notice | कारणे दाखवा नोटीसला बिबी ग्रा.पं.चे स्पष्टीकरण

कारणे दाखवा नोटीसला बिबी ग्रा.पं.चे स्पष्टीकरण

कोरपना : कोरपना तालुक्यातील बिबी ग्रामपंचायतीच्‍या आदर्श ग्राम दौऱ्याबाबत तक्रारी करण्यात आल्यानंतर जि.प.चे सीईओ यांनी सरपंचांना कारणे दाखवा नोटीस बजावली. उत्तरादाखल बिबीचे सरपंच मंगलदास गेडाम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यात बिबी हे स्मार्ट ग्राम असून स्मार्ट ग्राम निधी निकषामधील तरतुदीनुसारच अभ्यास दौरा केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विरोधकांनी कारणे दाखवा नोटीसला वसुलीचे आदेश म्हणून जनतेची दिशाभूल केली असल्याचे मत सरपंच मंगलदास गेडाम यांनी व्यक्त केले आहे. बिबी ग्रामपंचायतीला २०१८-१९ चा राज्य शासनाचा जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी गावातील महिलांनी लोकसहभाग दर्शवून मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. बिबी ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा यामध्ये तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. तालुका स्मार्ट ग्राम व जिल्हा स्मार्ट ग्राम अशी एकूण चार पारितोषिके मिळाल्यामुळे महिलांनी पेसा ग्रामसभेत केलेल्या मागणीची दखल घेऊन राज्यातील आदर्श गावाचा दौरा करण्यासंदर्भात २६ जानेवारी २०२० च्या विषय क्रमांक ६/३ नुसार ठराव पास केला.

पेसा ग्रामसभेचा ठराव सर्वोच्च आहे. आदर्श ग्राम दौऱ्यासाठी येणाऱ्या महिलांनी एक हजार रुपये लोकसहभाग म्हणून भरायचे व उर्वरित रक्कम ग्रामपंचायत भरणार असे ठरवण्यात आले. त्यानुसार १२१ लोकांची यादी तयार झाली. १२१ गावकऱ्यांचे दोन हजार प्रतिव्यक्ती याप्रमाणे २ लाख ४२ हजार रुपयांचा खर्च ग्रामपंचायतीने केला. छत्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीने तीन ट्रॅव्हल्स उपलब्ध करून दिल्याने धनादेशाद्वारे एकत्र रक्कम देण्यात आली. सोबत जागा कमी पडल्याने तीन स्काॅर्पिओसुद्धा दौऱ्यामध्ये वापरण्यात आल्या. यासाठी लागणारा व इतर उर्वरित खर्च लोकसहभागातून करण्यात आला. त्याचीसुद्धा बिले ग्रामपंचायतीकडे उपलब्ध आहेत. ग्रामपंचायतीने नियमाला अनुसरून बिले न दिल्यामुळे आपल्याकडून सदर रक्कम वसूल का करण्यात येऊ नये, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नोव्हेंबर महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजावली. यावर आपण व ग्रामविकास अधिकारी यांनी उत्तर सादर केल्याचे गेडाम यांनी सांगितले. यासंदर्भात आदर्श दौरा करण्याकरिता महिला व बालकल्याण विकास अधिकारी यांची परवानगी घेण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Show Reasons Explanation of Bibi G.P. to the notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.