जिल्ह्यातील दुकाने आता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:49+5:302021-04-02T04:29:49+5:30

चंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडित हॉस्पिटल, दवाखाने, मेडिकल, पॅथॉलॉजी, रक्तपेढी व तत्सम आस्थापना वगळता ...

Shops in the district are now open from 7 am to 8 pm | जिल्ह्यातील दुकाने आता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंतच

जिल्ह्यातील दुकाने आता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंतच

चंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडित हॉस्पिटल, दवाखाने, मेडिकल, पॅथॉलॉजी, रक्तपेढी व तत्सम आस्थापना वगळता सर्व दुकाने, आस्थापना, मार्केट दररोज सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेतच सुरू राहील, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल दिले आहेत.

नवीन नियमावलीनुसार रेस्टॉरंट व हॉटेल बैठक क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांच्या उपस्थितीत सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील. तसेच त्यांना रात्री ११ वाजेपर्यंत घरपोच सेवा सुरू ठेवता येईल. शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी कमी होण्याच्या दृष्टीकोनातून लोकप्रतिनिधींव्यतिरिक्त इतर अभ्यागतांना तातडीच्या कामाशिवाय परवानगी दिली जाऊ नये. सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने जागेच्या उपलब्धतेनुसार एका तासाकरिता प्रवेश देण्यात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या निश्चित करावी. अभ्यागतांकरिता ऑनलाइन आरक्षणासारख्या सोयीची सुरुवात करावी. तसेच या ठिकाणी प्रवेशाकरिता मास्कचा वापर बंधनकारक राहील. प्रवेशस्थळी तापमान मोजण्याचे साधन, परिसरातील प्रत्येक ठिकाणी हात धुण्याकरिता साबण अथवा सॅनिटायजर ठेवावे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता, साथरोग कायदा व इतर संबंधित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Shops in the district are now open from 7 am to 8 pm