शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

धक्कादायक; जिल्ह्यात 548 मुलींचे झाले अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

२१ व्या शतकात नवनव्या संसाधनांचा शोध लागला. त्यामुळे लहान वयातच मुलांच्या हातात ॲन्ड्राॅईड मोबाईल आले. यातील विविध अप्लिकेशनद्वारे देश-विदेशातील मित्र-मैत्रिणीच्या संगतीत अडकले. घरातील संवाद लोप पावला. त्यातच लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल वापरण्याची मोकळीक मिळाली. याकडे पालकांचे दुर्लक्ष झाले.

ठळक मुद्देआमिषाच्या बळी; ५३९ जणांना शोधण्यात पोलिसांना यश

परिमल डोहणे  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होतानाच अल्पवयीन मुलींच्या अपहरणातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील साडेतीन वर्षात ५४८ अल्पवयीन मुलींचे, तर ९९ अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात सर्व कुटुंब एकत्र असताना व बाहेर पडण्यास बंदी असतानासुद्धा २१४ मुलींचे अपहरण झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यातील ४२२ जणांचा शोध लावण्यास पोलीस विभागाला यश आले असले तरी, अपहरणाची ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. २१ व्या शतकात नवनव्या संसाधनांचा शोध लागला. त्यामुळे लहान वयातच मुलांच्या हातात ॲन्ड्राॅईड मोबाईल आले. यातील विविध अप्लिकेशनद्वारे देश-विदेशातील मित्र-मैत्रिणीच्या संगतीत अडकले. घरातील संवाद लोप पावला. त्यातच लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल वापरण्याची मोकळीक मिळाली. याकडे पालकांचे दुर्लक्ष झाले. याचाच फायदा घेत अनेकांनी आमिष दाखवून १८ वर्षाखालील सुमारे २१४ मुलींचे व ३१ मुलांचे अपहरण जानेवारी २०२० पासून मे २०२१ या कालावधीत केल्याची नोंद जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत दाखल आहे. मागील साडेतीन वर्षांची आकडेवारी बघितल्यास, जिल्ह्यात ५४८ मुलींचे, तर ९९ मुलांचे अपहरण झाले. त्यापैकी ४२२ मुली व ८७ मुले शोधण्यात पोलिसांना यश आले आहे, 

साडेतीन वर्षात ५६० जण बेपत्ता सन २०१८ पासून मे २०२१ पर्यंत जिल्ह्यात १८ वर्षावरील ३८७ महिला, तर १७३ पुरुष असे एकूण ५६० जण बेपत्ता झाले आहेत. यापैकी १२० पुरुषांचा, तर २७२ महिलांचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले आहे. यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून दरवर्षी एक महिना ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येते. त्याअंतर्गत अनेकांना शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे

स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातून लावला मुलींचा शोधजिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या मुलींचा तपास स्थानिक पातळीवरील पोलीस करतात. चार महिन्यात त्याचा शोध लागला नाही, तर तो स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येते. स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक यासाठी काम करीत असते. आतापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेने अपहरण झालेल्या मुली या हैदराबाद, राजस्थान, गुजरात आदी परराज्यातून हुडकून काढल्या आहेत. यावरून अपहरणाचे कनेक्शन परराज्यात असल्याची साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.  

चार महिन्यानंतरही अपहरणातील व्यक्तीचा शोध लागला नसल्यास ते प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे येते. आमचे एक विशेष पथक त्यासाठी काम करते. मागील सन २०१८ पासून ६४७ जणांचे अपहरण झाले आहे. त्यापैकी ५३९ जणांचा शोध लावण्यास यश आले आहे. तसेच मिसींगच्या प्रकरणासाठी एक महिना ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येते. त्याद्वारे ५४८ पैकी ३९० जणांचा शोध लावला आहे. -बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर 

 

टॅग्स :Missingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारी