शिवापूर, पडझरीत ३० फुटांचे मचाण

By Admin | Updated: March 25, 2015 01:30 IST2015-03-25T01:30:15+5:302015-03-25T01:30:15+5:30

मूल वनपरिक्षेत्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या शिवापूर, पडझरी कक्ष क्र. ३२३ मधील मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आहे.

Shivpura, 30 feet of water table | शिवापूर, पडझरीत ३० फुटांचे मचाण

शिवापूर, पडझरीत ३० फुटांचे मचाण

राजू गेडाम मूल
मूल वनपरिक्षेत्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या शिवापूर, पडझरी कक्ष क्र. ३२३ मधील मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आहे. घनदाट जंगल असल्याने अवैध वृक्षतोड, आग लावण्याचे प्रकार वाढत आहे. हे हेरुन वनविभागाने ३० फूट उंचीची मचाण उभारले आहे. या मचाणीद्वारे वन्यप्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबरोबरच अवैध शिकार करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत मूल वनपरिक्षेत्र कार्यालय येत असल्याने बफर झोन परिसरातील मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त परिसर आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्याचा वावर आहे. या परिसरात नेहमी वन्य प्राणी आढळतात. येथील वन्यप्राण्यांवर देखरेख ठेवता यावी तसेच धनदाट जंगलात आग लावून वनसंपदा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास वेळीच बंदोबस्त करण्यासाठी तसेच वनसंपदा नष्ट होण्यापासून संरक्षण करण्यासाठी बफरझोन परिसरातील शिवापूर चक, पडझरी येथील कक्ष क्र. ३२३, मध्ये ३० फूट उंचीचे मचाण उभारण्यात आली आहे.
या मचाणीवर बसून वन्यप्राण्याबरोबरच आगीचेदेखील निरीक्षण करता येणार आहे. याच कक्ष क्र. ३२३ जवळच येथील वनमजूर भिकाऊ शेंडे यांनी वनकुटी निर्माण केली आहे. या वनकुटीत जवळपास चार ते पाच वनमजूर रात्रभर जंगलात राहून वन्यप्राण्यांच्या देखरेखीबरोबरच वनसंपदेचे रक्षणसुद्धा केले जात आहे. जंगल व्याप्त परिसर असला तरी सदर परिसर सुखकारक व दिलासा देणारा असल्याने रविवार अथवा इतर दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रममाणात पर्यटक भेट देतात.
जंगलात उभारलेल्या मचाणीवरूनही पर्यटक वन्यप्राणी बघण्याचा आनंद घेत आहे. या घनदाट जंगलात वन्यप्राण्यांसोबत अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरूही मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाने वाव दिल्यास पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Shivpura, 30 feet of water table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.