शिवाजी महाराज जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:31 IST2021-03-01T04:31:39+5:302021-03-01T04:31:39+5:30

चंद्रपूर : बल्लारपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताह तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख ...

Shivaji Maharaj Jayanti, Swatantryaveer Savarkar Memorial Day Program | शिवाजी महाराज जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिन कार्यक्रम

शिवाजी महाराज जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिन कार्यक्रम

चंद्रपूर : बल्लारपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताह तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर होते. अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिहं चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी नगराध्यक्ष लखनसिंह चंदेल यावेळी उपस्थिती होती.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी हंसराज अहीर यांनी चंदनसिंह चंदेल, लखनसिंह चंदेल, श्रीनिवास सुंचूवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. संचालन समीर केने, आभार मनीष पांडय यांनी मानले. कार्यक्रमाला नगरपालिका उपाध्यक्ष मीना चौधरी, नगरसेविका सारिका कनकम, सुवर्णा भटारकर, काशीनाथ सिंह, विश्वजीत सिंह चंदेल, कृष्णसिंह चंदेल, जगदीश गहरवार, राजू दारी, मुन्ना ठाकूर, शिवचंद्र व्दिवेदी, अशोक गुप्ता, राजू गुंडेटी, रण्यजेय सिंह, देवेंद्र वाटकर, वैशाली जोशी, आरती आक्केवार, मनोज खत्री, विकास राजूरकर, राजू दासरवार, राजकुमार श्रीवास्तव, कांता ढोके, नीरज झाडे, प्रकाश दोतपल्ली, नितीन तांदळे आदींची उपस्थिती होती.

:

Web Title: Shivaji Maharaj Jayanti, Swatantryaveer Savarkar Memorial Day Program