चंद्रपुरात शिवसेनेतर्फे नारायण राणेंचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST2021-08-25T04:33:29+5:302021-08-25T04:33:29+5:30

चंद्रपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपा जनआशीर्वाद दौऱ्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री व ...

Shiv Sena protests Narayan Rane in Chandrapur | चंद्रपुरात शिवसेनेतर्फे नारायण राणेंचा निषेध

चंद्रपुरात शिवसेनेतर्फे नारायण राणेंचा निषेध

चंद्रपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपा जनआशीर्वाद दौऱ्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याविरोधात शिवसेना जिल्हा कार्यालय ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल वरोरा नाका चौक येथे नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक फोटोचे दहन करून नारेबाजी करण्यात आली.

नारायण राणे हे केंद्रीय मंत्री पदावर आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यकुशलतेमुळे देशात प्रथम क्रमांक पटकाविलेले मुख्यमंत्री म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असून महाराष्ट्रातील जनता हे मुळीच खपवून घेणार नाही. त्यामुळे नारायण राणे यांनी केलेल्या गैर वक्तव्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. यासंदर्भातील निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख निलेश बेळखडे, शहर प्रमुख प्रमोद पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे, कुसुम उद्गार, वर्षा कोटेकर, स्वनिल काशीकर, विनय धोबे, सुमित अग्रवाल, हेमराज बावणे, वसीम शेख, इलियास शेख, सिकंदर खान, सोनू ठाकूर, बाळू भगत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena protests Narayan Rane in Chandrapur