शिवसेनेकडून विविध जणांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:26 IST2021-04-06T04:26:32+5:302021-04-06T04:26:32+5:30

मूल : तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन प्रतिमेची ...

Shiv Sena felicitates various people | शिवसेनेकडून विविध जणांचा सत्कार

शिवसेनेकडून विविध जणांचा सत्कार

मूल : तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन प्रतिमेची पूजा शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केली.

कार्यक्रमाचे औचित्य साधून मूल येथील यशस्वी उद्योजक हिरेन शहा, मूल येथील प्रथम चार्टर्ड अकाउंटंट सावन बुटे, प्रथम बालरोगतज्ज्ञ डाॅ. उज्ज्वल बोकारे व मूल येथील हीरो होंडा शोरूमचे मालक दिनेश पडगेलवार यांचा शाल व श्रीफळ देऊन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शहरप्रमुख राहुल महाजनवार, तालुका संघटक सुनील काळे, तालुका कार्यालयप्रमुख आशिष गुंडोजवार, शहर समन्वयक अरविंद करपे, उपतालुकाप्रमुख रवी शेरकी, कपिल येलगेलवार, मधुकर पवार, युवासेना तालुकाप्रमुख संदीप निकुरे, युवासेना शहरप्रमुख निखिल भोयर, युवासेना उपशहरप्रमुख शिनू कन्नुरवार, तालुका समन्वयक अनिल सोनुले, विनोद काळबांधे उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena felicitates various people