वाढीव गृहकराविरोधात शिवसेनेने कंबर कसली

By Admin | Updated: September 30, 2016 01:08 IST2016-09-30T01:08:43+5:302016-09-30T01:08:43+5:30

महानगरपालिकेने गृहकरात पुन्हा वाढ करून वाढीव कराच्या नोटीस नागरिकांना दिल्या आहेत. याचा शिवसेनेने विरोध केला असून ही वाढ अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

Shiv Sena against Waqar | वाढीव गृहकराविरोधात शिवसेनेने कंबर कसली

वाढीव गृहकराविरोधात शिवसेनेने कंबर कसली

करवाढ मागे घ्या : १७ ला मनपावर मोर्चा
चंद्रपूर : महानगरपालिकेने गृहकरात पुन्हा वाढ करून वाढीव कराच्या नोटीस नागरिकांना दिल्या आहेत. याचा शिवसेनेने विरोध केला असून ही वाढ अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. ही करवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी शिवसेना चंद्रपूर विधानसभेच्या वतीने १७ आॅक्टोंबरला मनपावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
चंद्रपूर शहर मनपाने मालमत्ता कर वाढवून शहरातील नागरिकांवर अन्याय केलेला आहे. जुन्या मालमत्ता कर आकारणीपेक्षा नवीन कर आकारणीत १५ पटीपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. यात नागरिकांना भरमसाठ कर आल्याने याची दखल घेऊन प्रथम शिवसेनेमार्फत तीव्र आदोलन करण्यात आले होते. परंतु कोणत्याही प्रकारची करवाढ मागे घेण्यात आलेली नाही. उलट चंद्रपूर शहरातील नागरिकाकडून तीन पट दंड वसूल करण्यात येत आहे. हा अन्याय शिवसेना कदापीही सहन करणार नाही. नागरिकांनी वाढीव मालमत्ता कराचा भरणा करु नये, ७० हजारापेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराविरुद्ध आक्षेप नोंदविला आहे. केंद्रीय मंत्री महोदयानी बैठक घेवून एक वर्षाकरिता मालमत्ता कर वाढीला स्थगिती दिल्याचे जाहीर करुन आपल्याच अभिनंदनाचे फलकसुद्धा लावून स्वत:ची वाहवा करुन घेतली होती. तरीही आता पुन्हा करवाढीची नोटीस देण्यात येत आहे, ही बाब अन्यायकारक असल्याचे जोरगेवार यांनी म्हटले आहे.

Web Title: Shiv Sena against Waqar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.