शिवार संवाद सभा व कार्यविस्तार योजनेसंबंधी माहिती पुस्तिका अमित शाह यांना सुपूर्द
By Admin | Updated: June 19, 2017 00:51 IST2017-06-19T00:51:09+5:302017-06-19T00:51:09+5:30
भारतीय जनता पार्टी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत घेण्यात आलेल्या शिवार संवाद सभा व पंडीत दिनदयाल उपाध्याय कार्य विस्तार योजना ....

शिवार संवाद सभा व कार्यविस्तार योजनेसंबंधी माहिती पुस्तिका अमित शाह यांना सुपूर्द
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत घेण्यात आलेल्या शिवार संवाद सभा व पंडीत दिनदयाल उपाध्याय कार्य विस्तार योजना या संबंधीतील विस्तृत माहिती देणारी संकलित पुस्तिका वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांना सुपुर्द केली. यावेळी अमित शाह यांनी सर्वाचे कौतूक केले.
भारतीय जनता पार्टी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात २५१ शिवार संवाद सभा घेण्यात आल्या. त्या माध्यमातून भाजपा पदाधिकारी व कार्यकत्यांनी शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती या सभांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविल्याची माहिती यावेळी अमीत शाह यांना देण्यात आली.
त्याचप्रमाणे पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त ३५४ बुथवर कार्यविस्तार योजनेसंबंधीच्या बैठकी घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे, फारूख शेख यांची प्रामुख्याने यांची व भाजपच्या इतर मंडळीची उपस्थिती होती.