जनता महाविद्यालयात शिक्षणमहर्षी श्रीहरी जीवतोडे स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:26 IST2021-03-28T04:26:35+5:302021-03-28T04:26:35+5:30

चंद्रपूर : येथील जनता महाविद्यालयात आज सकाळी ११ वाजता शिक्षणमहर्षी स्व. श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांचा स्मृतिदिन कार्यक्रम घेण्यात आला. ...

Shikshan Maharshi Shrihari Jeevatode Memorial Day at Janata College | जनता महाविद्यालयात शिक्षणमहर्षी श्रीहरी जीवतोडे स्मृतिदिन

जनता महाविद्यालयात शिक्षणमहर्षी श्रीहरी जीवतोडे स्मृतिदिन

चंद्रपूर : येथील जनता महाविद्यालयात आज सकाळी ११ वाजता शिक्षणमहर्षी स्व. श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांचा स्मृतिदिन कार्यक्रम घेण्यात आला.

चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाखांमध्ये हा कार्यक्रम पार पडला. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा जिवतोडे व सचिव तथा प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील सर्व जनता विद्यालय, महाविद्यालयात विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुजींना श्रद्धांजली अर्पण करून आठवणींना उजाळा देण्यात आला. जनता महाविद्यालयातील कार्यक्रमात गुरुजींच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य डॉ. महातळे, डॉ. पाटील, प्रा. बोढाले, प्रा. चहारे, रजिस्ट्रार दिनकर अडबाले, प्रा. रविकांत वरारकर, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Shikshan Maharshi Shrihari Jeevatode Memorial Day at Janata College