शेखर धोटे यांचा राजीनामा एकमताने मंजूर

By Admin | Updated: July 22, 2015 01:32 IST2015-07-22T01:32:13+5:302015-07-22T01:32:13+5:30

येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांचा राजीनामा अखेर मंगळवारी झालेल्या विशेष सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

Shekhar Dutte's resignation unanimously approved | शेखर धोटे यांचा राजीनामा एकमताने मंजूर

शेखर धोटे यांचा राजीनामा एकमताने मंजूर

प्रतीक्षा नव्या अध्यक्षाची : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घडामोडींना वेग
चंद्रपूर : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांचा राजीनामा अखेर मंगळवारी झालेल्या विशेष सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. २७ संचालकांपैकी एकमेव संदीप गड्डमवार या बैठकीला अनुपस्थित होते. उपस्थित सर्व संचालकांनी धोटे यांच्या राजीनाम्याला स्विकृती दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात दुपारी १२.३० वाजता ही बैठक सुरू झाली. विषयपत्रिकेवर केवळ राजीनामा स्वीकृतीचा एकमेव विषय होता. केवळ अर्धा तास चाललेल्या या बैठकीत अध्यक्ष शेखर धोटे यांच्यासह उपाध्यक्ष प्रभा वासाडे यांच्याही राजिनाम्याला एकमताने मंजुरी मिळाली.
गेल्या १६ जुलैला या विषयावरील चर्चेसाठी संचालकांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र कोरमअभावी ती तहकूब करून २१ जुलैला घेण्यात आली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चित्तरंजन नाईक यांच्याकडे प्रशासकीय अधिकार आले असून पुढील निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडेच कामकाज राहणार आहे. बैठकीत मंजूर करण्यात आलेले दोन्ही राजीनामे सहकार खाते प्रधिकरणाकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणुकीची पुढील तारीख ठरविली जाणार आहे. यासाठी किमान १० ते १५ दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सर्वांचे चांगले सहकार्य आपल्या कार्यकाळात लाभले. त्यामुळचे बँक विकासाच्या प्रगतिपथावर आपण नेऊ शकलो. आपल्या कार्यकाळात बँकेची चांगली प्रगती झाली. यापुढे आपण अध्यक्ष नसलो तरी बँकेच्या प्रगतीमध्ये आपला नेहमी हातभार राहील.
- शेखर धोटे, माजी अध्यक्ष
१८ संचालक भ्रमंतीवर
इकडे शेखर धोटे यांचा राजीनामा मंजूर होताच दुसरीकडे बँकेतील १८ संचालकांना भ्रमंतीवर पाठविण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. २७ संचालकांच्या या बँकेत पाऊणकर यांच्या नावाला काही संचालकांनी अद्यापही पसंती दर्शविलेली नाही. यामुळे वेळेवर काही दगाफाटा होऊ नये, याची खबरदारी म्हणून हा भ्रमंतीचा बेत आखण्यात आल्याची माहिती एका संचालकाने दिली आहे.

Web Title: Shekhar Dutte's resignation unanimously approved