तिने त्याला बदडले व कव्हेत घेवून त्याचे अश्रूही पुसले

By Admin | Updated: April 3, 2017 02:00 IST2017-04-03T02:00:55+5:302017-04-03T02:00:55+5:30

प्रेमाच्या आणा भाका झाल्या. प्रेमाचे रूपांतर विवाह करण्याची शपथ दोघांनी घेतली.

She wiped her tears and took away her wet pussy and wiped her tears | तिने त्याला बदडले व कव्हेत घेवून त्याचे अश्रूही पुसले

तिने त्याला बदडले व कव्हेत घेवून त्याचे अश्रूही पुसले

आनंदवन चौकातील घटना : बघ्यांची उडाली झुंबड
वरोरा : प्रेमाच्या आणा भाका झाल्या. प्रेमाचे रूपांतर विवाह करण्याची शपथ दोघांनी घेतली. परंतु विवाहाच्या शपथेपासून तो दूर जात असल्याचे वाटल्याने तिने चक्क चौकामध्ये प्रियकरास बदडले. परंतु तिचे त्याच्यावर प्रेम असल्यामुळे तिने त्याला कव्हेत घेवून अश्रू पुसले. हा प्रियकर-प्रेयसीचा थरार वरोरावासीयांनी आनंदवन चौकात अनुभवला.
प्रियकर भंडारा जिल्ह्यातील तर प्रेयसी ही नागपुरातील आहेत. काही वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू आहेत. प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याचे दोघांनीही ठरविले. त्यानंतर प्रियकर प्रेयसीला भेटणे टाळत होता. विवाह करण्याकरिता त्याने एक-दोन युवतीची पाहणी केल्याची बाब प्रेयसीच्या लक्षात आली.
प्रियकर वरोरा येथील आनंदवन चौकानजीक एका महाविद्यालयात परीक्षा देण्याकरीता जात असल्याची चाहुल प्रेयसीला लागली. त्यावरून तीदेखील नागपूर येथून वरोरा शहरातील आनंदवन चौकात येवून प्रियकराच्या पेपर सुटण्याची वाट बघू लागली. परीक्षेचा पेपर देवून तो आनंदवन चौकात येताच प्रेयसीने त्याला बदडने सुरू केले. प्रियकर घाबरून गेला. त्याला काही सुचेनासे झाले. त्याने आपल्या अश्रुला वाट मोकळी करून दिल्याने प्रेयसीलाही गहिवरून आले. त्याला आपल्या कव्हेत घेवून ती त्याचे अश्रू पुसू लागली. हा थरार वरोरावासीय बघत होते. प्रकरण परत समोर जाईल, याकरिता काही कार्यकर्त्यांनी त्यांना वरोरा पोलीस स्टेशनमध्ये नेले परंतु दोघांनीही तक्रार देण्यास नकार दिला. ही माहिती प्रेयसीच्या घरी कळविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या सर्व घडामोडीनंतर त्यांचा विवाह होणार की नाही, अशी चर्चा वरोरावासीयांमध्ये केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: She wiped her tears and took away her wet pussy and wiped her tears