‘त्या’ पोलीस शिपाई झाल्या ठाणे अंमलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST2021-03-09T04:31:46+5:302021-03-09T04:31:46+5:30

चंद्रपूर : जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बघितला. महिला पोलिसांनी ठाणे ...

'She' became a Thane police officer | ‘त्या’ पोलीस शिपाई झाल्या ठाणे अंमलदार

‘त्या’ पोलीस शिपाई झाल्या ठाणे अंमलदार

चंद्रपूर : जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बघितला. महिला पोलिसांनी ठाणे अमंलदार म्हणून सोमवारी दिवसभर काम बघितले. काही घटना घडल्यास पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविणे, गुन्ह्याची फिर्याद घेणे आदी कामे महिला कर्मचाऱ्यांनी केली.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याच्या अनुषंगाने रामनगर पोलिसांनी ठाण्यामध्ये कार्यरत सर्व महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार यांना ठाणे अंमलदार म्हणून जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सर्व महिला कर्मचाऱ्यांनीच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ठाणे अमंलदाराची भूमिका बजावली. त्यानंतर, एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडून पोलीस खात्याचे कर्तव्य बजावल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राधिका पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंदा दंडवते यांच्यासह सर्व महिला पोलीस अंमलदार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला रामनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी रोशन यादव व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 'She' became a Thane police officer