शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

ती झाली 21 व्या वर्षी महाडोळीची सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

प्रतिभा मांडवकर या मूळच्या शेगाव या गावच्या असून, आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन (वरोरा) येथे बीएससी द्वितीय वर्षाला शिक्षण सुरू आहे, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएचे शिक्षण सुरू आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही प्रतिभाने जिद्दीच्या भरवशावर अपक्ष उमेदवार म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज सादर केला होता.

ठळक मुद्देअपक्ष लढविली निवडणूक : अविरोध झाली निवड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहेत. ठिकठिकणी अनेक जण सरपंच होण्यासाठी दावे-प्रतिदावे करीत आहेत. अशातच  वरोरा तालुक्यातील महाडोळी गटग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीची अवघ्या २१ व्या वर्षी सरपंचपदी  बिनविरोध वर्णी लागली,  त्यामुळे गावातच नाही, तर परिसरात सर्वच तिचे कौतुक केले जात आहे. प्रतिभा शालीकराव मांडवकर असे सरपंच तरुणीचे नाव आहे. जिल्ह्यात सर्वात कमी वयाची सरपंच  म्हणून प्रतिभा मांडवकर असल्याचे बोलल्या जात आहे. ती ओबीसी महिला प्रवर्गातून निवडून आली आणि  गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे. गावातील नागरिकांनी टाकलेल्या  विश्वासाला तडा जाऊ न देता गावाच्या विकासाठी काम करणार असल्याचे  तिने सांगतिले.  भविष्यात समाजकार्य  महाविद्यालयातून पदवी घेत आपले शिक्षणही पूर्ण करणार असल्याचे मत ‘लोकमत’सोबत बोलताना व्यक्त  केले. 

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाहीप्रतिभा मांडवकर या मूळच्या शेगाव या गावच्या असून, आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन (वरोरा) येथे बीएससी द्वितीय वर्षाला शिक्षण सुरू आहे, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएचे शिक्षण सुरू आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही प्रतिभाने जिद्दीच्या भरवशावर अपक्ष उमेदवार म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज सादर केला होता. अपक्ष उमेदवार असतानाही गावातील पक्षांना, पॅनलला पराजीत करून विजयाची माळ आपल्या गळ्यात टाकली. एका सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलगी असलेल्या प्रतिभा यांची सरपंचपदी आता निवड झाली आहे.

माझ्या मनात नेहमीच समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी यावर्षी निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरला. निवडणुकीत सर्व मतदार बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. त्यामुळे महाडोळी गट ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी निवड झाली. मी गावच्या विकासासाठी कटिबद्द असून, सर्वोतोपरी गावाचा विकास करणे हेच एक ध्येय डोळ्यासमोर आहे.- प्रतिभा शालीकराव मांडवकर, सरपंच महाडोळी ग्रामपंचायत, 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच