सराफा लाईनमध्ये शुकशुकाट

By Admin | Updated: March 4, 2016 00:56 IST2016-03-04T00:56:59+5:302016-03-04T00:56:59+5:30

शासनाने सराफा व्यावसायिकांसाठी एक टक्का उत्पादन शुल्क लावल्याने सोने खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम होणार आहे.

Shawkukkat in the bullion line | सराफा लाईनमध्ये शुकशुकाट

सराफा लाईनमध्ये शुकशुकाट

बंदचा परिणाम : कोट्यवधींची उलाढाल ठप्प
चंद्रपूर : शासनाने सराफा व्यावसायिकांसाठी एक टक्का उत्पादन शुल्क लावल्याने सोने खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात देशभरातील सराफा व्यावसायिकांनी तीन दिवस बंद पुकारला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे दोनशे ते अडीचशे सराफा दुकाने बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प पडली आहे. याशिवाय ऐन लग्नाच्या हंगामात चंद्रपुरातील गजबजलेल्या सराफा लाईनमध्ये शुकशुकाट पसरला आहे.
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार एखाद्या ग्राहकाने दोन लाखांची सोने खरेदी केली तर त्याला पॅनकॉर्ड दाखवावे लागणार आहे. याशिवाय उत्पादन शुल्क एक टक्का आकारण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. यामुळे सोने खरेदी-विक्री व्यवहारावर विपरित परिणाम होणार आहे, असे चंद्रपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सत्यम सोनी यांनी म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात सराफा व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर शहरात सुमारे ७० सराफा दुकाने आहेत. जिल्ह्यात या दुकानांची संख्या दोनशे ते अडीचशेच्या घरात आहे. दररोज या दुकानातून कोट्यवधींची उलाढाल होते. २ मार्चपासून जिल्ह्यातील सराफा दुकाने बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प पडली आहे.
चंद्रपुरातील गिरनार चौक ते गांधी चौक मार्गावर सराफा व्यावसायिकांची चाळच आहे. जिल्हाभरातील ग्राहक येथे येत असल्याने नेहमी हा परिसर गजबजलेला राहतो. मात्र मागील दोन दिवसांपासून या परिसरात शुकशुकाट पसरला आहे.
विशेष म्हणजे, सध्या लग्न सराईचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे या दिवसात सोने-चांदीच्या दागिन्यांची जोरात खरेदी होत असते. मात्र सतत तीन दिवस ही दुकाने बंद असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Shawkukkat in the bullion line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.