बाभळीचे झाड ट्रकवर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 23:16 IST2018-09-03T23:16:15+5:302018-09-03T23:16:34+5:30
ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील सुरबोडी गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेले बाभळीचे झाड ट्रकवर अचानक कोसळले. यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होवून वाहनाच्या दोन किमीपर्यंत लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.

बाभळीचे झाड ट्रकवर कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील सुरबोडी गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेले बाभळीचे झाड ट्रकवर अचानक कोसळले. यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होवून वाहनाच्या दोन किमीपर्यंत लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
ब्रह्मपुरीवरुन-वडसेकडे कोंडा भरून जाणाऱ्या ट्रकवरील पोत्यांना बाभळीच्या झाडाच्या फांद्या अडकल्याने अख्खे बाभळीचे झाडच ट्रकवर पडले. या घटनेमुळे ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील वाहतूक दुपारी १२ वाजतापासून ४ वाजेपर्यंत ठप्प पडल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सदर घटनेची माहिती संबंधित ट्रकचालकाने ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला कळविली. त्यानंतर ब्रह्मपुरी पोलीस विभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी क्रेन मशिन व लाकूड कटाई मशिन बोलावून पडलेल्या बाभळीच्या झाडाला बाजूला केले. सुमारे चार तासानंतर या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. सुदैवाने या घटनेत जिवित हानी झाली नाही. याप्रसंगी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे जमादार येरलवार, बावणे, वाहतूक पोलीस मेंढे यांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावून वाहतूक पूर्ववत सुरू केली.