उपद्रवी वन्यप्राण्यांसाठी शार्प शूटर

By Admin | Updated: September 4, 2015 00:54 IST2015-09-04T00:54:13+5:302015-09-04T00:54:13+5:30

वन्यप्राण्याकडून शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात येत असल्याच्या तक्रारीमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे.

Sharp shooter for raging wildlife | उपद्रवी वन्यप्राण्यांसाठी शार्प शूटर

उपद्रवी वन्यप्राण्यांसाठी शार्प शूटर

वरोरा: वन्यप्राण्याकडून शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात येत असल्याच्या तक्रारीमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. यावर वनविभागाने उपाय शोधत उपद्रव करणाऱ्या वन्यप्राण्यांची शिकार करण्याकरिता तीन शार्प शुटरची नियुक्ती केली आहे.
वन्यप्राण्याकडून शेतातील पिकांची नासाडी करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना याबाबत नुकसान भरपाई दिली जाते. ही नुकसान भरपाई अत्यल्प असल्याने शेतकरी मागील कित्येक दिवसांपासून ओरडत आहे. त्यामुळे शेतात वारंवार पिकांची नासाडी करणाऱ्या वन्यप्राण्यांची शिकार करण्याची परवानगी शेतकरी मागत आहे. परंतु शेतकऱ्यांना शिकार करण्याची परवानगी दिल्यास यामध्ये दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने वनविभागाने आपलेच शार्प शूटर नियुक्त केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sharp shooter for raging wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.