मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा भोयर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:16 IST2021-02-19T04:16:39+5:302021-02-19T04:16:39+5:30
सावली : तालुक्यातील मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा खुमाजी भोयर यांची एकमताने निवड झाली. १५ जानेवारी रोजी मेहा बुजरूक ...

मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा भोयर
सावली : तालुक्यातील मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा खुमाजी भोयर यांची एकमताने निवड झाली. १५ जानेवारी रोजी मेहा बुजरूक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यात शेतकरी ग्रामीण विकास आघाडीचे सातही उमेदवार विजयी झाले होते. सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव निघाले. मात्र, या प्रवर्गातील सदस्य नसल्याने सरपंचपद सुधारित आरक्षण येईपर्यंत पुढील काही महिन्यांसाठी रिक्त राहणार आहे. दरम्यान, उपसरपंच पदासाठी निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून पंचायत समितीचे बंडू मुरकुटे आणि ग्रामसेवक अनिल टेकाम यांची उपस्थिती होती. यावेळी उपसरपंचपदी शारदा खुमाजी भोयर यांची एकमताने निवड झाली. ग्रामपंचायत सदस्यात वॉर्ड क्रमांक १ मधून किरण महादेव ठाकरे, भावना योगेश चिमूरकर, वॉर्ड क्रमांक २ मधून चिमणदास गिरिधर निकुरे, शीतल सुनील ठाकरे, वॉर्ड क्रमांक ३ मधून रूपेश गणपत रामटेके, पंकज गजानन दलांजे यांचा समावेश आहे.