भद्रावतीत ३३ लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:19 IST2018-01-30T23:18:33+5:302018-01-30T23:19:19+5:30

ट्रकमधून दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून ३३ लाखांची देशी दारू जप्त केली.

In Shadra, Rs. 33 lakhs worth of liquor was seized | भद्रावतीत ३३ लाखांचा दारूसाठा जप्त

भद्रावतीत ३३ लाखांचा दारूसाठा जप्त

ठळक मुद्देएकाला अटक : एक आरोपी फरार, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आॅनलाईन लोकमत
भद्रावती : ट्रकमधून दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून ३३ लाखांची देशी दारू जप्त केली. ही कारवाई चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टप्पा परिसरात सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास केली.
पोलिसांनी दारू साठ्यासह ट्रक ताब्यात घेऊन एकाला अटक तर दुसरा आरोपी फरार झाला. शोधपथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. विजय मधुकर लांजेवार (३७) रा. टेका नाका नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मोनू शर्मा कपीलनगर रा. नागपूर हा फरार आहे.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त मांिहतीच्या आधारे एम.एच. ४० बी. जी. ४५०८ आणि सीजी ०४ जीबी ९९२५ क्रमांकाच्या दोन ट्रकला भद्रावती परिसरात अडविण्यात आले. या ट्रकमधून ३३ लाखांच्या देशी दारूसह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईने भद्रावती पोलीस बॅकफुटवर आले आहे.

Web Title: In Shadra, Rs. 33 lakhs worth of liquor was seized