सावलीचे ग्रामीण रूग्णालय वैद्यकीय अधीक्षकांविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 05:00 IST2020-03-02T05:00:00+5:302020-03-02T05:00:11+5:30
सावली हे तालुक्याचे ठिकाण असून १११ गावांचा समावेश आहे. तालुक्यातील रुग्ण ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरिता मोठ्या प्रमाणात येतात. परंतु, या रूग्णालयात नियमित वैद्यकीय अधीक्षक नसल्याने रूग्णावर पाहिजे त्या प्रमाणात उपचार होत नाही. त्यामुळे रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर केले जाते. परिणामी रूग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

सावलीचे ग्रामीण रूग्णालय वैद्यकीय अधीक्षकांविना
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुक्याच्या मुख्यालयात एक ग्रामीण रूग्णालय आहे. परंतु, मागील चार वर्षांपासून ग्रामीण रूग्णालयाचा प्रभार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर असल्याने रूग्णसेवा प्रभावीत झाली आहे.
सावली हे तालुक्याचे ठिकाण असून १११ गावांचा समावेश आहे. तालुक्यातील रुग्ण ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरिता मोठ्या प्रमाणात येतात. परंतु, या रूग्णालयात नियमित वैद्यकीय अधीक्षक नसल्याने रूग्णावर पाहिजे त्या प्रमाणात उपचार होत नाही. त्यामुळे रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर केले जाते. परिणामी रूग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रूग्णालयात पाहिजे त्या प्रमाणात औषधसाठा उपलब्ध नसल्याने रूग्णांना खासगी रूग्णालयात धाव घ्यावी लागते.शासनाकडून आरोग्यसेवा नियमित मिळण्याकरिता कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. मात्र या रूग्णालयात अनेक सुविधांचा अभाव असल्याने उद्दीष्टपूर्ती होत नाही.
कायमस्वरुपी वैद्यकीय अधीक्षकांची मागणी
साधा आजार असणाºया रूग्झाांना सुद्धा या रूग्णालयातून रेफर केले जाते. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक रूग्णावर उपचार करण्याकरिता वेळेवर येत नसल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत रूग्ण दगावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या रूग्णालयात नियमित व अधिकृत वैद्यकीय अधीक्षकांची नेमणूक करण्याची मागणी जोर धरत आहे.
सावली येथे चार वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी एक अधिकाºयाकडे अधीक्षकांचा पदभार दिला आहे. वैद्यकीय अधीक्षक हे वर्ग एकचे पद आहे. ते शासनस्तरावरुन एमपीएससी किंवा बळतीने भरल्या जाते. रुग्णावर योग्य पद्धतीने उपचार सुरु आहेत.
निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर
आरोग्य सेवा सुस्थितीत राहण्यासाठी सावली येथील ग्रामीण रूग्णालयात तत्काळ नियमित व अधिकृत वैद्यकीय अधीक्षकांची नेमणूक करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- अनिल स्वामी
अध्यक्ष, शेतकरी सोसायटी सावली