सावलीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

By Admin | Updated: April 1, 2016 01:21 IST2016-04-01T01:21:46+5:302016-04-01T01:21:46+5:30

सावली वनपरिक्षेत्रात वनमजूर म्हणून कार्यरत शामराव मनोहर चाफले रा. साखरी यांना पगारवाढीच्या कारणावरून वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी शिविगाळ करून ...

Shadow law enforcement officer has filed a complaint | सावलीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

सावलीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

पोलीस तक्रार : वनमजुरास शिविगाळ व मारण्याची धमकी
सावली : सावली वनपरिक्षेत्रात वनमजूर म्हणून कार्यरत शामराव मनोहर चाफले रा. साखरी यांना पगारवाढीच्या कारणावरून वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर सावली पोलीस ठाण्यामध्ये भादंवी कलम २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनमजूर शामराव चाफले हे अनेक वर्षांपासून वनमजूर म्हणून सावली वनपरिक्षेत्रात कार्यरत आहेत. वेतन वाढसाठी त्यांनी २० जानेवारी २०१६ लेखी विनंती अर्ज वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे दिला. यावर काहीही कार्यवाही न झाल्याने वनमजुराने स्मरणपत्र दिले. या सततच्या अर्ज करण्याच्या प्रवृत्तीमुळे वनपरिक्षेत्राधिकारी राठोड चिडून मानसिक त्रास देत पगारवाढच्या अर्जावर विचार न करता तुझी बदली मुडझा परिक्षेत्र करतो अशी धमकी दिली. २१ मार्च २०१६ ला वनपरिक्षेत्रअधिकारी राठोड यांनी वनमजुराला कार्यालयात बोलावून खानाबाद येथे जाण्याची मौखिक सुचना दिली. मात्र मजुराने विनंती करून आपल्या गावाजवळच बदली करण्याची विनंती केली. तेव्हा राठोड यांनी वनमजुराला अश्लिल शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व धक्काबुक्की करून कार्यालयाबाहेर हाकलले. ही घटना घोडेवाहीचे पोलीस पाटील दुधे, मारोती घोनमोडे व महिलांच्या उपस्थितीत घडली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Shadow law enforcement officer has filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.