आदिवासी युवतीचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:54 IST2021-03-04T04:54:14+5:302021-03-04T04:54:14+5:30

कोरपना : तालुक्यातील एका गावातील आदिवासी युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याबाबत कोरपना ...

Sexual abuse of a tribal girl | आदिवासी युवतीचे लैंगिक शोषण

आदिवासी युवतीचे लैंगिक शोषण

कोरपना : तालुक्यातील एका गावातील आदिवासी युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याबाबत कोरपना पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

एका गावातील मुलीबरोबर समाजमाध्यमातून ओळख करून युवकाने मैत्री केली. हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. तिला अनेकदा लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. ही युवती चंद्रपूर येथे शिकत असतानासुद्धा संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप पीडित युवतीने केला. दरम्यान, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू असताना त्याच्या तयारीसाठी किरायाने राहत असताना युवकाने आपल्याशी बळजबरीने संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. युवतीने आपल्या आई-वडिलांसोबत पोलीस ठाणे गाठून मंगळवारी तक्रार दाखल केली. यावरून आरोपीविरुद्ध भादंवि ३७६(२)(एन), अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (३)१(डब्ल्यू) (२) व ३(२)(वि अ)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून, कोरपना पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Sexual abuse of a tribal girl