देशी दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST2021-06-03T04:20:39+5:302021-06-03T04:20:39+5:30

सिंदेवाही : तालुक्‍यातील जामसाळा-वासेरा मार्गावर नाकाबंदी करून वाहनाची झडती घेतली असता, त्यातून एक लाख ६० हजार रुपयांची दारू आणि ...

Seven lakh items including native liquor seized | देशी दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त

देशी दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंदेवाही : तालुक्‍यातील जामसाळा-वासेरा मार्गावर नाकाबंदी करून वाहनाची झडती घेतली असता, त्यातून एक लाख ६० हजार रुपयांची दारू आणि कार एकूण सात लाख ६७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

गुप्त माहितीवरून पोलिसांनी नाकाबंदी केली होती. एका कारमधून देशी दारू जप्त केली. या कारवाईत हितेश कोकुलवार रा. राजोली व अन्य दोन आरोपींना अटक केली. सदर देशी दारू सुशांत बडीवार रा. वासेरा यांच्याकडून जुन्या गोडाऊनमधून आणल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळाची झडती घेतली असता, पुन्हा संत्रा राकेट कंपनीचे देशी दारू आढळून आली. गाडीसह एकूण सात लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपींना अटक केली. पुढील तपास सिंदेवाही पोलीस निरीक्षक योगेश घारे, निरकर करीत आहेत.

Web Title: Seven lakh items including native liquor seized