घरकुलासाठी सात किलोमीटर पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:49 IST2018-02-10T23:49:27+5:302018-02-10T23:49:48+5:30
पंचवीस वर्षे लोटली. मात्र, गावकऱ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. पाठपुरावा करून शासनाचे लक्ष नाही. गावकऱ्यांचा संताप अनावर झाला.

घरकुलासाठी सात किलोमीटर पायपीट
आॅनलाईन लोकमत
वढोली : पंचवीस वर्षे लोटली. मात्र, गावकऱ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. पाठपुरावा करून शासनाचे लक्ष नाही. गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. वढोली ते गोंडपिपरी असा सात किलोमीटर पायदळ प्रवास करीत नागरिकांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
गावातील साधारणत: शंभराहून अधिक कुटुंबीयांना घरकुलाची आवश्यकता आहे. पन्नासहून अधिक कुटुंबीयांचे बेहाल आहे. ते मोडकडीस आलेल्या झोपडीत आपले जीवन जगत आहे. घरकूल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी नागरिकांनी आवश्यक ती कागदपत्रे जमा केली. मात्र त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वढोलीवासीयांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले.