वेकोलिला प्रकल्पग्रस्तांचा सात दिवसांचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:50+5:302021-03-19T04:26:50+5:30
सास्ती खाण बंद पाडण्याचा दिला इशारा : वेकोलिच्या सास्ती क्षेत्रात अधिग्रहित जमीनधारकाना हवा मोबदला सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर ...

वेकोलिला प्रकल्पग्रस्तांचा सात दिवसांचा अल्टिमेटम
सास्ती खाण बंद पाडण्याचा दिला इशारा
:
वेकोलिच्या सास्ती क्षेत्रात अधिग्रहित जमीनधारकाना हवा मोबदला
सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती भूमिगत खाणीचे धोपटाला खुल्या कोळसा खाणीकरिता नव्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे. मात्र प्रकल्पात कंपनी ना नोकरी देत आहे ना मोबदला. या कामात सारखा विलंब होत असल्याने सास्ती व कोलगाव या दोन ग्रामपंचायतीनी सदर प्रश्न सात दिवस निकाली न काढल्यास आंदोलन तीव्र करून खाणच बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.
या क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून ही शेतीची अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पात सास्ती, धोपटला, कोलगाव, मानोली या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहे. शेकडो शेतकऱ्यांना आज उद्या नोकरी लागेल व जमिनीचा मोबदला मिळेल, अशी आशा आहे. मात्र कंपनीने दोन, चार प्रकल्पग्रस्तांना चेक देऊन इतरांना गाजर दाखविला. नोकरीचा प्रश्न तर अनुत्तरितच आहे. या कामासाठी कार्यालयात गेले तर शेतकऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून अपमानीत करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहे. आज उद्या मोबदला मिळेल या आशेवर कुटुंबातील कामे अर्धवट पडले आहे.
बॉक्स
शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट
कुटुंबातील मुलाचे वय वाढून रिकामे फिरत आहे. शेतीची खरेदी-विक्री बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.
वेकोलीने या परिसरातील शेतजमिनी तत्काळ घेऊन त्यांना मोबदला व नोकरी देण्याची मागणी सास्तीचे सरपंच रमेश पेटकर, उपसरपंच कुणाल कुंडे, कोलगाववचे सरपंच अनिता सुधाकर पिपळकर, उपसरपंच पुरुषोत्तम लांडे यासह अनेक प्रकलग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. ही मागणी तत्काळ मान्य न केल्यास २६ मार्चला सास्ती कोळसा खाणींचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भातील निवेदन वेकोलिच्या मुख्य महाप्रबंधकांना दिले आहे.